रणरागिनी महिला पत्रकारांचा जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे सन्मान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव:- शहरातील बळीरामपेठेतील जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे मंगळवार ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला व्यासपीठावर ज्येष्ठ महिला पत्रकार शांताबाई वाणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी महापौर जयश्री महाजन, लोकमतच्या भावना शर्मा तसेच लाइव्ह ट्रेन्ड न्युजच्या संचालिका लीना शेखर पाटील यांची उपस्थिती होती. पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ गोपी सोरडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश व स्वरूप स्पष्ट केले.

कार्यक्रमात शांताबाई वाणी, शुभदा नेवे, भावना शर्मा , लीना पाटील, दिव्य मराठीच्या धनश्री बागुल, पल्लवी सोनवणे, पुष्पा पाटील, गौरी बारी, वैशाली पाटील, प्रा. केतकी सोनार, वर्षा लोहार , सोनम पाटील, सुवर्णा पाटील, सुरेखा कोतवाल, शालीनी कोळी, कविता ठाकरे, जागृती भावसार, सविता कानडे, सरित‍ा खाचणे, सकीना सैफी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यामीनी कुळकर्णी, प्रेमलता पाटील यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सत्कारार्थी महिलांमधून शुभदा नेवे यांनी मनोगत व्यक्त करत या क्षेत्रातील विविध बाबींवर प्रकाश टाकला तसेच अनुभव कथन केले. या सन्मानामुळे पुढे चांगल्या पद्धतीने कार्य करण्यास मोठी ऊर्जा मिळाली असल्याचे ते म्हणाले सूत्रसंचालन यामिनी कुलकर्णी यांनी केले. तर आभार मनिष पात्रीकर यांनी मांडले.

महिला आव्हानात्मक जबाबदारी पार पाडताहेत – महापौर जयश्री महाजन

यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी मनोगतात जिल्हा पत्रकार संघाच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. बातम्या पोहचण्याचे महत्वाचे व आव्हानात्मक कार्य महिला पार पडताहेत या महिलांच्या कामगिरीच विशेष कौतुकही केलं. परिस्थिती बदलतेय पत्रकारिता क्षेत्रातही महिला पुढे असल्याचा आनंद असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्याची इतरही महिला दखल घेवून या क्षेत्रात पुढे येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.