mod bod clothing coupons rain chains world coupon very british christmas gifts dove mens face wash coupon benefit makeup gift sets
Thursday, December 1, 2022

उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलण्याची संधी न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

मंगळवार दि. १४ जून रोजी श्री क्षेत्र देहु येथे श्री संत तुकाराम महाराज मंदीर यांचे तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदीर लोकार्पण समारंभ झाला. सदर सभेस मार्गदर्शन करण्यापूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बोलण्याची संधी दिली नाही.

- Advertisement -

महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे, परंपरा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतांना कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना संभाषण करु दिले नाही. याचा जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसने तिव्र शब्दात निषेध केला. यापुढे केंद्र सरकारने याबाबतीत दक्षता घ्यावी.  या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक काँग्रेस अध्यक्ष सुनील शिंदे, जितेंद्र बागरे, संजय जाधव, अंकित पटेल, चंद्रमणी सोनवणे, विनोद सूर्यवंशी इत्यादीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या