जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
संत बाबा गुरदासराम चॅरिटेबलट्रस्टच्या नेत्रज्योति हॉस्पिटल, सिंधी कॉलनी जळगावतर्फे संत बाबा गुरदासराम साहेब यांच्या ९१ व्या जन्मोत्सव निमित्त सालाबादप्रमाणे दि. १५ जून २२ बुधवार रोजी स.९.३० ते संध्या ६.३० पर्यंत भव्य निःशुल्क नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉ. हीरा जोशी, डॉ. अल्विन राणे, डॉ. शिरीष पाटील हे तपासणी करणार असून त्यात मोतीबिंदूसाठी निवडलेल्या रुग्णांवर इंडियन लेन्स टाकून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल तसेच त्या रुग्णांची आवश्यक रक्त तपासणी डॉ. तुषार बोरोले यांचे तुषार पथोलॉजी लॅबच्या सहकार्याने रक्त तपासणी देखील मोफत करण्यात येणार आहे. त्याच बरोबर डोळ्याच्या मागील पडद्याची रेटीना तपासणी डॉ. श्रुती चांडक यांचे मार्फत मोफत केली जाणार आहे. तसेच सकाळी ९.३० ते ३ दरम्यान माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांचे सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दंत विभागात डॉ. पिंकी नाथानी, डॉ. वर्षा रंगलानी व डॉ. सुप्रिया कुकरेजा मोफत दंत तपासणी करतील, तसेच ओरंगाबाद येथील मॅक्सीलो फेशियल सर्जन डॉ. दीपक मोटवानी यांचे मार्फत डेंटल इम्प्लांटमधे विशेष सवलत देण्यात येईल.
जनरल तपासणी डॉ. मोहनलाल सध्रिया हे करतील. तरी सर्व समाजातील रक्तदात्याना व रुग्णांना ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. गुरुमुख जगवानी, उपाध्यक्ष दिलीप मंघवणी, सेक्रेटरी डॉ. मूलचंद उदासी व सर्व ट्रस्टीगण मार्फत विनंती करण्यात येते की, जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून गरजू रुग्णांची मदत करण्यास सहकार्य करावे तसेच मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा.