सौभाग्यवतींकडून वटपौर्णिमादिनी पतीच्या दिर्घायुष्यासाठी साकडे

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पतीच्या दिर्घायुष्यासाठी सौभाग्यवतींकडुन वट पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीला साकडे घालण्यात येते. तो दिवस म्हणजे वटसावित्री पौर्णिमा हिंदू धर्मात या  पौराणिक सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. भारतातील स्त्रियांच्या वतीने या वटपौर्णिमा या सणाला खुप महत्वाचे मानले जाते. या दिवशी त्या आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्य व सुख सम्रुद्धिसाठी मगन करतात.

त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण विवाहित महिला सण साजरा करतात. या दिवशी एक अख्यायिका सांगण्यात येते की, पौराणिक काळात आपल्या भक्तीच्या जोरावर सावित्रीने या वटपौर्णिमाचे पुजन करून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमराजाकडुन चतुर बुद्धीने परत आणले. यमराजाकडुन तीन वरदान मागताना पहिले वचन सासऱ्याचं राज्य, दुसरे वचन जीवनात भरभराटी तसेच सुख सम्रुद्धि तर तिसरे वचन पुत्र प्राप्ती हे तीन वचन दिल्याने नाईजास्तव यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.

या विशेष दिनाच्या निमित्ताने शहरातील वाकी रोड वरील धनपुष्प व साईनाथ नगरातील महिलांनी आपल्या हातावर मेहंदी काढीत. तसेच नवीन साडी परिधान व श्रृंगार करून पुजेच्या ताटात तांदूळ,  गहू, पाच प्रकारचे धान्य, गोड पदार्थ, तुपाचा दिवा, सुगंधीत अगरबत्ती, फुले, दुर्वा  घेऊन वडाच्या झाडाचे मनोभावे पुजन केले. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पतीच्या आयुष्याची दोरी याच प्रकारे लांबावी व पतीराजावर कुठल्याही प्रकारची संकटे न येता आपला संसार हा सुखाने चालावा यासाठी सावित्रीला साकडे घालण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.