Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»माध्यमांसाठी, अभ्यासकांसाठी 1952 पासूनच्या निवडणुकीचा मागोवा असलेली पूर्वपीठिका झाली प्रसिद्ध
    जळगाव

    माध्यमांसाठी, अभ्यासकांसाठी 1952 पासूनच्या निवडणुकीचा मागोवा असलेली पूर्वपीठिका झाली प्रसिद्ध

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 15, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 देशभर सुरु आहे. निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचे कार्य प्रसारमाध्यमाकडून केले जाते. त्यासाठी  जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने, जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाकडून निवडणुकीचा 1952 पासूनचा मागोवा घेतलेली जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वपिठी केचे प्रकाशन आज सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील हे उपस्थित होते.

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने माध्यमे तसेच अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या पूर्वपिठीकेत जळगाव जिल्ह्यातील 1952 सालापासून 2019 पर्यंत घेण्यात आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील विजय पराभूत उमेदवार, त्यांना मिळालेले मतदान याबाबतचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे.तसेच माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीच्या कामाकाज, आदर्श आचार संहितेत ‘काय करावे, काय करू नये ‘ या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. तसेच या पूर्वपीठिकेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, व अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावेर अंकुश पिनाटे यांचे आवाहन पर मनोगत प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यासोबतच प्रथमच या जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने महत्वाचे दूरध्वनी क्रमांक देखील या पुस्तिकेत प्रकाशित करण्यात आले आहेत.

    या पुस्तिकेसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर व जिल्हा निवडणूक शाखेचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले आहे.

    jalgaon Jalgaon Constituency Loksabha Election 2024
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif