बापरे.. जळगावचा डॉक्टर हनी ट्रॅपच्या जाळ्यात; मागितली ७ लाखांची खंडणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या हानी ट्रॅप (honey trap) आणि सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यामुळे अनेकांना लाखोंचा चुना लागत आहे तर काही बदनामीपोटी आत्महत्या करत आहे.  जळगाव शहरातील एक ४० वर्षीय डॉक्टरला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून ७ लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार महिलांसह ८ जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल (Crime) करण्यात आला आहे.

शरीरसुखाची ऑफर देत बनवला व्हिडीओ

डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी संगनमत करुन कट रचून डॉक्टरला शरीरसुखाची ऑफर देत दोघा महिलांच्या साथीदारांनी व्हिडीओ बनवला. यापैकी एक महिला जळगाव शहरातील व दुसरी यावल तालुक्यातील आहे. या व्हिडीओच्या बळावर चेतन व हिरामन नावाच्या दोघांनी डॉक्टरला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच प्रदिप व संदीप या दोघांच्या मदतीने सात लाख खंडणीची मागणी करण्यात आली. सात लाख रुपये दिले तरच तुमचे मॅटर संपेल नाहीतर हे व्हिडीओ व्हायरल करू. यामुळे तुमची समाजात बदनामी होईल, जीवनातून उठवून टाकण्याची धमकी देण्यात आली.

गुन्हा दाखल

दरम्यान या त्रासाला कंटाळून डॉक्टरने शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेवून फिर्याद दिली. याप्रकरणी ४ महिलांसह चेतन राजेंद्र कासार, हिरामण एकनाथ जोशी, प्रदीप सुरेश कोळी, (सैदाणे), संदीप बबन लोंढे (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा जळगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 336/22 भा.द.वि. 389, 323, 506, 34, 120(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात चार महिला व चार पुरुष अशा एकुण आठ जणांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.