Thursday, February 2, 2023

व्हॉटसअ‍ॅपवर नवीन फीचर लॉन्च; कसे वापरायचे जाणून घ्या

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मेसेजिंगसाठी व्हॉटसअ‍ॅप (WhatsApp) हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे. व्हॉटसअ‍ॅपवरून मेसेज करणे, फाइल्स पाठवणे, कॉल – व्हिडीओ कॉल करणे अशा अनेक गोष्टी सहजरित्या करता येतात.

व्हॉटसअ‍ॅपकडूनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. असेच एक नवे फीचर लाँच करण्यात आले आहे. या फीचरचे नाव आहे ‘कॉल लिंक’ या फीचरच्या मदतीने ‘गूगल मीट’प्रमाणे व्हॉटसअ‍ॅप कॉलची लिंक शेअर करता येणार आहे.

- Advertisement -

कॉल लिंक हे फीचर याआधी आयओएस युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले होते. आता हे फीचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी रोल आऊट करण्यात आले आहे. या फीचरमुळे उपलब्ध होणाऱ्या लिंकचा वापर करून तुम्ही सहजरित्या कोणत्याही कॉल किंवा व्हिडीओ कॉलमध्ये सहभाग घेऊ शकता किंवा इतरांना तुमच्या कॉलची लिंक शेअर करून त्यांना आमंत्रित करू शकता.

असा वापर ‘कॉल लिंक’ फीचर 

– तुमचे व्हॉटसअ‍ॅप उघडून त्यात कॉल या सेक्शनमध्ये जा.

– त्यामध्ये तुम्हाला सर्वात वर क्रिएट कॉल लिंक (Creat Call Link) हा पर्याय दिसेल, तो निवडा.

– हा पर्याय निवडल्यावर तुमची कॉल लिंक तयार होईल.

– यामध्ये तुम्ही कॉलचा प्रकार, म्हणजे कॉल किंवा व्हिडीओ कॉल यापैकी एक पर्याय निवडु शकता.

– खाली देण्यात आलेल्या पर्यायाद्वारे तुम्ही ही लिंक कोणालाही शेअर करून त्यांना कॉलमध्ये समाविष्ट करू शकता.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे