वडली येथील 30 वर्षीय तरुणाचा पाय घसरून मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव;  तालुक्यातील वडली येथील ३० वर्षीय तरूणाचा पाय घसरून पडल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घडली आहे.गोपाल नामदेव दहिपाते (वय-३०) रा. वडली ता. जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोपाल दहिपाते हा तरूण शेती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कामावरून घरी आल्यानंतर गल्लीत त्याचा पाय घसरला. यात गोपालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रात्री ११ वाजता शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी शासकीय रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

रात्री ११.३० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मंगळवार १ मार्च रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गोपाल याच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.