वयोवृध्दाला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जुन्या भांडणाच्या कारणावरून ७७ वर्षीय वयोवृध्दाला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील बोरनार येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील बोरनार येथील रहिवाशी पिंताबर झिंपरू चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. दरम्यान मागील भांडणाच्या कारणावरून बुधवार २५ मे रोजी सकाळी १० वाजता त्यांचे शेजारी राहणारे इब्राहिम इसाखॉ कुरेशी याने पितांबर चौधरी यांना शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पितांबर चौधरी यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून इब्राहिम इसाखॉ कुरेशी रा. बोरनार ता. जि. जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here