सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकरिणीवर सदस्य पदी चोपड्याचे चंद्रहास गुजराथी बिनविरोध

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकरिणीची बैठक प्रदेश अध्यक्षा डाॅ. शशिताई आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१३ फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी ११ वाजता जळगाव येथील जनता बँकेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. बैठकीत सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकरिणीवर सदस्य पदी चोपडा पीपल्स बँकेचे विद्यमान चेअरमन चंद्रहास नटवरलाल गुजराथी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा सहकार भारतीच्या उपाध्यक्षपदी पीपल्स बँकेचे संचालक नेमीचंद सुकलाल जैन तर सहसंघटक म्हणून गिरीश माळी यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली.

सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकरिणीच्या बैठकीला प्रदेश अध्यक्षा डाॅ. शशिताई आहिरे, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप रामू पाटील, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, प्रदेश संघटन मंत्री संजय परमाणे, प्रदेश सहसंघटन मंत्री शरद जाधव यांचेसह सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत सहकार भारती संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकरिणीवर जळगाव जिल्ह्यातून एकमेव सदस्य म्हणून चोपडा पीपल्स बँकेचे विद्यमान चेअरमन चंद्रहास नटवरलाल गुजराथी यांच्या नावाची घोषणा सहकार भारती संस्थेचे प्रदेश सहसंघटन मंत्री शरद जाधव यांनी केली. त्याला उपस्थित मान्यवरांनी सर्वानुमते मान्यता दिली. त्याबद्दल चंद्रहास गुजराथी यांचा सहकार भारतीच्या प्रदेश अध्यक्षा डाॅ. शशिताई आहिरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकरिणीवर सदस्य म्हणून चंद्रहास गुजराथी तर जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नेमीचंद जैन तर सहसंघटक म्हणून गिरीश माळी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार प्रा. दिलीपराव सोनवणे, चोसाकाचे माजी चेअरमन अ‍ॅड. घनशाम पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक घनशाम अग्रवाल, बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील, चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.