Saturday, October 1, 2022

सराईत दुचाकीचोर जेरबंद; चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरातून विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहे. संशयित आरोपी रूपेश संजय पाटील रा. साखरे ता. धरणगाव हा त्याच्या साथीदारासह जळगाव शहरात दुचाकींची चोरी करत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.

या गुप्त माहितीनुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, युनुस शेख, रमेश जाधव, पोलीस हवलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे, पोना राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील, प्रविण मांडोळे, उमेश गोसावी, हेमंत पाटील, दिपक शिंदे, मुबारक देशमुख यांनी सापळा रचुन संशयित आरोपी रूपेश पाटील याला अटक केली. त्याच्या कडून चोरीच्या एकुण पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

दरम्यान दिलेल्या कबुलीतून व हस्तगत करण्यात आलेल्या चोरीच्या दुचाकीच्या माध्यमातून जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनमधील २, जळगाव शहर पोलिस स्टेशनमधील २ व पंचवटी पोलिस स्टेशन नाशिक येथील एक असे एकुण ५ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासकामी त्याला जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या