तरूणावर धारदार शस्त्राने वार; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील सम्राट कॉलनी येथील १८ वर्षीय तरूणावर जुन्यावादातून धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखन अशोक झाल्टे (वय १८,) रा. सम्राट कॉलनी, जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. लखन झाल्टे हा आईवडील व बहिणीसोबत वास्तव्याला आहे. तो फुले मार्केटमधील मनोहर कापड दुकानात कामाला आहे. रविवार २० फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास लखन झाल्टे हा दुध घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे रोहीत लालचंद चव्हाण रा. ईच्छादेवी मंदिराच्या मागे तांबापूरा जळगाव हा तिथे आला.

जुन्या वादातून लखनवर धारदार वस्तूने मानेवर, पाठिवर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत लखन याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता लखन झाल्टेची आई हीरा झाल्टे यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. सदर तक्रारीवरून संशयित आरोपी रोहीत लालचंद चव्हाण रा. ईच्छादेवी मंदिराच्या मागे तांबापूरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.