वाळूची चोरटी वाहतूक; ट्रॅक्टर चालकासह मालकावर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आशाबाबा नगरातून चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. याबाबत ट्रॅक्टर चालकासह मालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय.

जळगाव शहरातील आशाबाबा नगर परिसरातून (एम.एच.१९ सी. यु. १७५३) या क्रमाकांचे ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. त्यास त्यानुसार रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख पोलिस नाईक जितेंद्र तायडे यांच्यासह कर्मचार्‍यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी आशाबाबा नगर येथे वाळुची वाहतूक करणाऱ्या संबंधित ट्रॅक्टरवर कारवाई केली.

एक ब्रास वाळूने भरलेले ट्रॉलीसह ट्रॅक्टर असा दोन लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अनिल वना पाटील रा. वैजनाथ ता. एरंडोल व ट्रॅक्टरमालक या दोन जणांविरूध्द रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तायडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.