जावई निघाला धीट; घातली सासूच्या डोक्यात वीट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातून धक्कदायक घटना उघडकीस आलीय. नवरा बायकोच्या वादामध्ये सासूने हस्तक्षेप केल्याचा राग आल्याने जावयाने सासूच्या डोक्यात वीट मारत जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील औद्यगिक वसाहत परिसरातील सुप्रिम कॉलनी पोलिस कॉलनी भागात राहणाऱ्या अनीस शरिफ भिस्ती याचे पत्नीशी भांडण झाल्यावर पत्नीने आपल्या आईला बोलावून घेतले. त्यानंतर ती आईसोबत माहेरी निघून गेली. बायको माहेरी निघून गेल्याचा राग आल्याने नवऱ्याने सासरी जाऊन बायकोला जाब विचारला असता त्यांच्या पुन्हा वाद झाला व त्याने बायकोला मारहाण केली.

दरम्यान सासू ज्योती ठाकूर यांनी या वादात हस्तक्षेप केला. याचा राग आल्याने अनीस याने जमिनीवर पडलेली वीट ज्योती ठाकूर यांच्या डोक्यात मारत जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.