जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; ५ जणांवर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकला. यावेळी रोकड, मोबाईल आणि जुगार खेळण्याचे साहित्य पोलीसांनी जप्त केला असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मेहरूण तलावाकडे असलेल्या एका मोकळ्या जागेत बुधवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास काही जण झन्नामन्ना जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी आणि एमआयडीसी पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलीसांनी संशयित आरोपी भुषण समाधान कोळी (वय २०, रा. तुकाराम वाडी, जळगाव), किशोर चिंतामन भोई (वय ३८, रा. तांबापुरा,जळगाव), गजानन समाधान हटकर (वय ३५, रा. गावळी वाडा. तांबापूरा), योगेश भागवत जाधव (वय २३, रा. अदित्य हॉटेल जळगाव रामेश्वर कॉलनी) आणि दिपक किसन सोनवणे (वय ४१, रा. देव्हारी उमाळा ता.जि.जळगाव) यांच्यावर कारवाई केली.

दरम्यान रोकड, मोबाईल आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकुण ६० हजार ५० रूपयांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, योगेश बारी, आरसीपी प्लाटूनचे पो.कॉ. महेश महाले, रविंद्र मोतीराया, ज्ञानेश्वर खराडे, गोपाल सोमवंशी, चंदन दराडे, भूषण नन्नवरे, गणेश बढे, रूपेश पाटील, रमेश जाधव, अंकूश पवार यांनी कारवाई केली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.