अमरावती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

अमरावती; छांगाणी नगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कार्यालय ललित कला भवनाच्या प्रांगणात 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक बंडुभाऊ हिवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .याप्रसंगी मंडळाचे अमरावती गटाचे कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी, सुप्रसिद्ध नाट्य कलावंत डॉ. श्याम देशमुख आणि  सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी चारुदत्त चौधरी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

कामगार कल्याण अधिकारी सत्यजीत चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकात ललित कला भवनात होणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहीती देत भारतीय संविधान हे 2 वर्ष 11 महिने व १८ दिवसात तयार करण्यात आले असून त्याचे  सर्वांगीण महत्व विशद केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बंडूभाऊ हिवसे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीच्या कार्याचा विस्तृत आढावा घेत यात डॉ.पंजाबराव देशमुख यांची भूमिका सुद्धा वाखाणण्याजोगी आहे असे प्रतिपादन केले .

चारुदत्त चौधरी यांनी आपल्या उद्बोधनात घटनेने १९ व्या कलमात दिलेल्या  अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल विस्तृत विवेचन करताना प्रतिपादन केले  की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हिरा हा नीतीमूल्यांच्या कोंदणातच शोभून दिसतो. अत्यन्त जबाबदारीने आपण या स्वातंत्र्याचा उपयोग करणे अपेक्षित आहे .

डॉ. श्याम देशमुख यांनी सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जगातील सर्वात मोठ्या अशा लिखित संविधानाचे निर्माण केले आहे आणि आपण सर्वांनी ते अतिशय प्रामाणिकपणे जपणे गरजेचे आहे .  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन कल्याण निरीक्षक सौ प्रतिभाताई पागधुने यांनी केले .कार्यक्रमाला सर्व कर्मचारी वृंदाची उपस्थिती होती .

Leave A Reply

Your email address will not be published.