podium sxs coupons island coupon gal blog see rock city coupons sports authority gifts for him decorated jar tops for gifts
Thursday, December 1, 2022

२० लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

माहेरहून २० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नेहा परेश सोनवणे (वय २२) यांचे जळगाव शहरातील हिराशिवा कॉलनीतील माहेर आहे. यांचा विवाह पुणे येथील परेश मनोहर सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार २०२१ मध्ये झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून  घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २० लाख रुपयांची मागणी केली.

- Advertisement -

विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिचा शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. पैशांसाठी सासरे, सासू, दीर यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. हा त्रास असाह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान विवाहितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पती परेश मनोहर सोनवणे, सासरे मनोहर आत्माराम सोनवणे, सासून शर्मीला मनोहर सोनवणे आणि दीर यश मनोहर सोनवणे सर्व रा. पुणे यांच्या वर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक गुलाब माळी करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या