तलवार घेवून फिरणारा तरूण अटकेत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील शनिपेठ हद्दीतील चौगुले प्लॉट परिसरात बेकायदेशीररित्या हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरूणाला शनिपेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील तलवार हस्तगत केली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील चौगुले प्लॉट परिसरात संशयित आरोपी पंकज भानुदास चौधरी (वय २४) हा हातात तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे, पोलीस नाईक बाविस्कर, पोलीस नाईक कांबळे, पो.कॉ. मुकुंद गंगावणे, राहुल पाटील यांनी रात्री ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपी पंकज चौधरी याला अटक केली.

संशयित आरोपीच्या ताब्यातील धारदार तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिपेठ पोलिस कर्मचारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.