आयुक्तपदाचा अतिरीक्त कार्यभार डॉ. विद्या गायकवाडांकडे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव महापालिकेचे आयुक्त डॉ. सतीश कुलकर्णी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पदाचा कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला असून याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

जळगाव शहर मनपाचे आयुक्त निवृत्त होत असून त्यांच्या रिक्त जागेवर कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यांच्या रिक्त होणार्‍या पदाची अतिरीक्त जबाबदारी मनपाच्या अतिरीक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे आदेश शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले.

यामुळे तूर्तास जळगाव शहर महापालिकेला कायमस्वरूपी आयुक्त मिळणार नसून डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे याची अतिरिक्त जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.