जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील भांडणाच्या कारणावरून एका भाजीपाला विक्रेत्याला फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना जळगाव शहरातील समता नगर भागात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय मधुकर बोरसे (वय ४१, रा. बजरंग मंदिराजवळ, समता नगर) हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. भाजीपाला विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार २८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता वाजेच्या सुमारास ते घरी असतांना मागील भांडणाच्या कारणावरून शेजारी राहणारे किरण अडकमोल, सनी अडकमोल, गायकवाडचा मोठा मुलगा (पूर्ण नाव माहीत नाही) आणि भावड्या दुगला करोसिया सर्व रा. समता नगर यांनी संजय बोरसे यांना शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
यावेळी यातील किरण अडकमोल याने संजय बोरसे यांच्या तोंडावर फायटरने मारून गंभीर दुखापत केली. जखमी संजय बोरसे यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी अडकमोल, सनी अडकमोल, गायकवाडचा मोठा मुलगा (पूर्ण नाव माहीत नाही) आणि भावड्या दुगला करोसिया सर्व रा. समता नगर यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.