जळगावातील रस्त्यांची दयनीय अवस्था; नागरिकांचा तीव्र संताप..

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील छत्रपती शिवाजीनगर मधील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खड्डयात रस्ते आहेत की रस्त्स्यात खड्डे आहेत. नागरिकांना कसरत करून प्रवास करावा लागत असल्याने हे कळत नसून मनपा व जिल्हा प्रशासनाकडे दुरुस्तीची वारंवार मागणी केली असता त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे.

सकाळी १० वाजता क्रांती चौक येथून आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. नागरिकांनी अचानक रास्तारोको आंदोलन केल्याने खेड्यातून जळगाव येथे व्यापार, व्यवसाय, शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हळ झालेत. दरम्यान, या रास्तारोको आंदोलनाने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती. यात विद्यार्थी देखील होते. ही बाब लक्षात घेत बस चालकाने आंदोलकांना बसला जाण्यासाठी मार्ग करून देण्याची मागणी केली.

परंतु आंदोलकांनी त्यांचे काहीएक ऐकून न घेता आपले आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी नागरिकांनी रस्त्यातील खड्डयांचे पूजन करत आज अंत्यसंस्कार केले. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आंदोलन स्थळी येवून ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.