विराट संघाबाहेर, अश्विन आणि केएल राहुलचे पुनरागमन

0

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क ;

वेस्ट इंडिजच्या T20I साठीच्या संघात विराट कोहलीला अखेर वगळण्यात आले आहे. अश्विन आणि KL राहुल संघात पुनरागमन करणार आहेत. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. तर विराट कोहली शिवाय जसप्रीत बुमराहलाही विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुलने जरी संघात पुनरागमन केले असले तरी त्याचा समावेश फिटनेस चाचणी नंतर समजणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI)  भारतीय वरिष्ठ निवड समितीने गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी संघाची घोषणा केली. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल तर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह संघात नसणार आहेत. गेल्या महिन्यात दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्यानंतर केएल राहुल संघात परतला आहे. मात्र, त्याचा समावेश फिटनेसच्या अधीन आहे. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही रिकॉल करण्यात आले आहे, तर लेगस्पिनर युझवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आलेले नाही. वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की कोहली आणि बुमराह या दोघांनाही मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यांची T20i  मालिका 29 जुलैपासून सुरू होणार आहे. 22 जुलैपासून सुरू होणार्‍या T20i पूर्वी तीन सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका खेळवली जाईल.

कुलदीप यादवलाही संघात स्थान देण्यात आले आहे, मात्र त्याचा समावेशही फिटनेसच्या अधीन आहे. एक्सप्रेस वेगवान गोलंदाज उमरान मलिक संघाचा भाग नसणार, तर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला मात्र T20i  साठी स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली होती आणि त्यात रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या सर्वांना विश्रांती देण्यात आली होती. अनुभवी सलामीवीर शिखर धवन वनडेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या ICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडू संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांना मिळालेल्या संधींच्या आधारे दीपक हुडा, आवेश खान आणि अर्शदीप सिंग या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीसह सर्वांचे लक्ष असेल. केएल राहुलचे दुखापतीतून पुनरागमन महत्त्वाचे ठरणार आहे कारण भारतीय संघ आपल्या टॉप ऑर्डरवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करेल. कोहलीला आतापर्यंत फॉर्म न गवसल्यामुळे आणि त्याच्या कंबरदुखीमुळे इंग्लंडविरुद्धचा पहिल्या एकदिवसीय सामन्यालाही तो मुकला होता. तर दुखापतीमुळे आज दुसऱ्या वनडेतही त्याचा सहभाग साशंक आहे.

भारतीय संघ खालील प्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल*, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव*, भुवनेश्वर*, भुवनेश्वर आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

Leave A Reply

Your email address will not be published.