पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यकर्त्यांना आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर उद्बोधन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज भाजपा कार्यालय वसंत स्मृति येथे LED स्क्रीन द्वारे देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट प्रक्षेपणा द्वारे कार्कर्त्यांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवि अनासपुरे, जिल्हाध्यक्ष ग्रामीण आ. सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष महानगर दीपक सूर्यवंशी, जि प अध्यक्षा रंजना ताई पाटील, प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष उज्वलाताई बेडाळे, गटनेते भगत बालाणी, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, हर्षल पाटील, जिल्हा पदाधिकारी प्रदीप रोटे, राहुल वाघ, शारदा पाटील आदी उपस्थित होते.

या प्रसंगी संघटनमंत्री रवि अनासपुरे यांनी काल निर्मला सीतारामन यांनी सर्व सामान्य जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला या बद्दल माहिती दिली व त्यांचे आभार व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेट सादर केल्यानंतर देशातील नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी भाजपने त्यांना बजेट समजवण्यासाठी बोलावल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर पंतप्रधान आज लाईव्ह आले. यावेळी त्यांनी यंदाचं बजेट सर्वसामान्यांसाठी फायद्याचं असल्याचं सांगितलं. नद्याजोड प्रकल्प आणि नळाला पाणी पुरवण्यासाठी खर्च करण्यात आलेले एक लाख कोटी रुपयांचं महत्व सांगितलं. यावेळी पंतप्रधानांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. 7 वर्षांपूर्वी भारताचा जीडीपी 1 लाख 10,000 कोटी रुपये होता. पण आज तो सुमारे 2 लाख 30,000 कोटी रुपये आहे. देशाचा परकीय चलन साठा 200 अब्ज डॉलरवरून $630 अब्ज झाला आहे. आमच्या सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे याचा फायदा मिळाला आहे.

9 कोटी ग्रामीण घरात पाणी पोहोचत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 5 कोटी पाण्याचे कनेक्शन दोन वर्षात करण्यात आले. 40 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता. येणाऱ्या काळात आणखी ६० हजार कोटींचा निधी यासाठी खर्च होणार आहे.काय म्हणाले पंतप्रधान?100 वर्षातील सर्वात मोठ्या वैश्विक महामारीशी देश लढत आहे. पुढे जे जग आपण पाहणार आहोत, ती कोरोनापूर्वीप्रमाणे नसणार आहे. द्वितीय विश्वयुद्धानंतर जगात मोठे बदल होणार आहेत. याचे संकेत आता दिसू लागले आहेत.भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. भारत आत्मनिर्भर बनायला हवा आणि त्यावर आधुनिक भारताचा निर्माण व्हायला हवे.गेल्या 7 वर्षात घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे मागच्या चुका सुधारल्या 1 लाख 10 हजार कोटीपासून 2 लाख 30 हजार करोडच्या आसपास निर्यात 4 लाख 70 हजार करोडपर्यंत पोहोचला.

भाऊसाहेब पाटील, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, अरुण सपकाळे, गोपाल भोंगाळे, जगदीश जोशी, महेश नारखेडे, सुचिताताई भालेराव, प्रकाश पंडित, आघाडी अध्यक्ष प्रमोद वाणी, प्रल्हाद वाणी, हेमंत जोशी अध्यात्मिक आघाडी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश भाऊ माळी व धीरज वर्मा, मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन सदाशिवराव ढेकळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद सपकाळे, जयंत चव्हाण, अक्षय जेजुरीकर, छायाताई सारस्वत, पूजाताई पाटील, सरिताताई विसपुते, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने संबोधण्यास उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.