ATM कार्डची आदलाबदली करून तरुणाला ३७ हजारात गंडवले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एटीएम कार्डची आदलाबदली करून तरुणाच्या खात्यातून ३७ हजार ५०० रूपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल मेरचंद पवार (वय ३८, रा. गजानन महाराज मंदीर, सुप्रिम कॉलनी, जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहतो. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विठ्ठल पवार छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाजळील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेत आला होता.

दरम्यान बँकेच्या बाहेर असलेल्या एटीएममधून पैसे काढत असतांना एका अनोळखी व्यक्तीने विठ्ठल पवार याला बोलण्यात गुंतवून त्याच्या एटीएमची आदला बदल केली. त्यानंतर पैसे निघाले नाही म्हणून विठ्ठल पवार बाहेर निघाला. थोड्यावेळानंतर त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ३७ हजारर ५०० रूपये काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी विठ्ठल पवार यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.