Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»ST चा संप जीवावर बेतला; रिक्षातून पडल्याने विद्यार्थिनीचा करुण अंत
    जळगाव

    ST चा संप जीवावर बेतला; रिक्षातून पडल्याने विद्यार्थिनीचा करुण अंत

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 25, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धावत्या रिक्षातून तोल जावून खाली पडलेल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यात घडली आहे.

    तृप्ती भगवान चौधरी (वय १७) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. एसटी बस सेवा बंद असल्यामुळे तृप्ती रिक्षाने प्रवास करत होती. मात्र हाच प्रवास तिच्यासाठी जीवघेणा ठरला. तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न. ह. रांका महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेचं शिक्षण घेत होती.

    गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने रिक्षांमध्ये जास्तीचे प्रवासी भरून अवैध वाहतूक केली जातेय. यामुळे अनेक अपघात होत आहेत. तृप्ती देखील रिक्षानेच महाविद्यालयात ये-जा करत होती. कॉलेजची वेळ सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत असल्याने ती नेहमीप्रमाणे गुरुवारी महाविद्यालयात आली. कॉलेज सुटल्यानंतर ती मैत्रिणींसोबत शेलवड येथे जाण्यासाठी निघाली. यावेळी तृप्ती रिक्षाच्या पुढील सीटवर बाहेरील बाजूने बसली. प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रीण रोहिणी राजेंद्र धनगर या दोघीही खाली पडल्या.

    दरम्यान तृप्ती बाहेरच्या बाजूने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर इजा झाली. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ. यशपाल बडगुजर यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला जळगावला हलवण्याचा सल्ला दिला.

    परंतु जळगावला नेत असताना वाटेतच तृप्तीने आपले प्राण सोडले. जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन त्यानंतर दुपारी ४ वाजता शेलवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

    ..तर माझी मुलगी वाचली असती

    यावेळी तृप्तीच्या वडिलांनी दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी तालुक्यात एसटी बसच्या दिवसभरातून २१ फेऱ्या होत होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वी एसटीचा संप सुरू झाला.यामुळे सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहने चालवतात. तृप्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज एसटी बस सुरू असत्या तर माझ्या मुलीचा जीव वाचला असता’.

     

    Accident News Bodwad jalgaon ST Workers Strike
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif