पत्नीचा गळा दाबून खून; आपल्या चार मुलांसह फरार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे

तळेगाव दाभाडे; लटकलेवस्ती, तळेगाव दाभाडे येथे पत्नीचा गळा दाबून खून करुन आपल्या चार मुलांसह फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तारा नईम शेख (वय 42, रा. टकलेवस्ती, तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी नईम शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार तारा शेख यांचा नईम शेख हा दुसरा पती असून त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. ती काही प्रमाणात मनोरुग्ण आहे. दोघेही पती-पत्नी भंगार गोळा करण्याचे काम करतात.

23 मार्च रोजी रात्री आठ वाजता एका पोत्यामध्ये मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना फोन करुन दिली.त्यानुसार घटनास्थळी पोलिस गेले असता त्यांना पोत्यामध्ये मृत महिलेचे शव दिसले. महिलेचा दोन-तीन दिवसांपूर्वी खून. केला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शवविच्छेदनामध्ये महिलेचा मृत्यू गळा दाबूनझाला असल्याचे समोर आले आहे.घटनेनंतर पोलिसांनी महिलेच्या घरी जावून माहिती घेतली असता महिलेचा पती चार मुलांसह फरार झाल्याचे समोर आले आहे. पतीच्या शोधासाठी पोलिसांची पथके पाठविण्यात आली आहेत.

घटनास्थळी पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक पोलिस आयुक्त भोसले पाटील यांनी भेटी दिल्या आहेत.या घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.