जी.पी.एस कॅम्पस मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि.14 जानेवारी रोजी जीपीएस कॅम्पस मध्ये जल्लोष 2023 हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र ना.गुलाबरावजी पाटील, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील, संस्थेचे चेअरमन दादासाहेब विक्रमजी गुलाबरावजी पाटील, विकास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रमोद सोनवणे, केंद्रप्रमुख राहुल खताळ, पी. आय गणेश बुवा एपीआय पाळधी, अलका प्रकाश पाटील, सरपंच पाळधी लक्ष्मीबाई शरद कोळी, सरपंच पाळधी मुकुंद शामराव ननवरे, माजी सभापती पंचायत समिती, अनिल नारायण पाटील, पंचायत समिती प्रेमराज शिवाजीराव पाटी, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, माजी पंचायत समिती चंदन कळमकर, उपसरपंच पाळधी आरती दिलीप पाटील व सरपंच पाळधी निलेश पाटील, जिल्हाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना, विलास महाजन शहर प्रमुख धरणगाव, महेंद्र महाजन उपजिल्हाप्रमुख युवासेना दीपक भदाणे, युवा सेना तालुकाप्रमुख नवल, पाळधी मागासवर्गीय तालुकाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना, कैलास पाटील ,श्री प्रवीण पाटील सर, कार्यक्रमाची सुरुवात नटराजाच्या मूर्तीच्या पूजनाने तसेच रंगमंचाच्या पूजनाने करण्यात आली.
पुजनाचे मानकरी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील होते. महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाची वाटचाल, प्रगतीचा आलेख पालकांसमोर मांडला.तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. इंग्लिश मिडीयम च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले मनमोहक नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविधतेत एकता, भारतीय सैनिकांचे बलिदान, असे अनेक नृत्य करत सादर केले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवरील नाटिका सादर करून सर्वांची मने जिंकली. तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ‘शिवचरित्र ‘ नावाचे महानाट्य सादर करून प्रेक्षकांच्या मनाचा थरकाप उडवला. अशाप्रकारे जीपीएस कॅम्पस मधील सर्वच विद्यार्थ्यांनी अनेक नृत्य, गाणे,नाटिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भविष्यात जीपीएस तर्फे विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये हरित प्रकारे मदत करण्याची सूचनाही दिली.

अशा पद्धतीने जीपीएस परिवारामध्ये द्वितीय वर्षातील जल्लोष 2023 हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदात उत्साहात पार पडला कारण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीपीएस परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्राचार्य यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.