रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग- भूषण मोरे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये रस्ता वाहतूक सप्ताह निमित्त मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर रायसोनी महाविद्यालयाचे ऍडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील भूषण मोरे व ऋषिकेश महाले , प्रा . रफिक शेख उपस्थित होते. बोलताना श्री. मोरे म्हणाले कि, वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करणे, अपघातास आळा घालणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे, पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना आपले वाहन चालविण्याकरीता ताब्यात देवू नये. रस्ते सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाचे असून रस्ते संदर्भातील कायदे व नियमाचे तंतोतत पालन होणे आवश्यक आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असते, त्यातही डोक्याला मार लागुन होणाऱ्या मृत्युंची संख्या जास्त असते.

त्यामुळे हेल्मेटचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे. अशाप्रकारे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा ही स्वयंप्रेरणेने पाळावयाची बाब आहे रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्यचे मत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे भूषण मोरे यांनी जी. एच. रायसोनी महाविद्यालयामध्ये बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देण्यात आली.

उपस्थितांना वाहतूक नियमावली बाबतचे पञक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वसीम पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद महाजन यांनी मानले तसेच प्रकाश शर्मा यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.