मोठी बातमी.. जुने बस स्थानक ते विद्यापीठ बस सुरु होणार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोनामुळे जळगाव शहर, जुने बस स्थानक ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे जाण्यासाठी व परत येण्यासाठी सिटी बसेस अद्याप बंदच होत्या. यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात शिक्षण घेण्यासाठी ये – जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना नाईलाजाने रिक्षाने प्रवास करावा लागत होता. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक झळ बसत आहे.

या समस्येची माहिती सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पाठपुरावा सुरु केला. या समस्येचे निराकरण होण्यासाठी त्यांनी एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेवून निवेदन दिले होते. उ.म.वि. त शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शहर बसेस पुर्ववत सुरु करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती.

सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या पाठपुराव्याची दखल घेत उ.म.वि.ला जाणा-या व येणा-या बसेस सुरु करण्याचे विभाग नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. या पत्राची एक प्रत गुप्ता यांना देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.