विवेकनिष्ठ वागणूक सर्व समस्यांचे समाधान – न्यायाधीश शेख

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मूळजी जेठा महाविद्यालयाच्या एन.सी.सी आणि एन.एस.एस. युनिट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर टी ओ कार्यालय आणि जळगाव वाहतूक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जागृती अभियानासंदर्भात कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ए.ए. शेख, डेप्युटी आर.टी.ओ. श्याम लोही आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक लीलाधर कानडे यांची व्याख्याने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसोर एस.एन. भारंबे हे अध्यक्षस्थानी होते.

श्याम लोही यांनी रस्ता अपघाताची कारणे आणि उपाय स्पष्ट केले तर न्यायाधीश शेख यांनी कायद्याच्या वाहतूक, रस्ता सुरक्षे बाबत सखोल बाबी छात्र सैनिकांना सांगितल्या. तसेच त्यानी स्वयंसेवक आणि छात्र सैनिक यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अपघात जनजागृती संदर्भात विविध फलक आणि रस्ता सुरक्षेसंदर्भात फलके लावण्यात आलेली आहेत. लेफ्ट. डॉ. योगेश बोरसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्था सांभाळून सुत्रसंचलन केले. एन.एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलवरसिंग वसावे यांचे सहकार्य लाभले तर सी.टी. ओ. गोविंद पवार यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.