जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त सागर पार्क समोरील पेट्रोल पंपावर ग्राहकांना ५४ लिटर रूपये दराने पेट्रोल देण्याचा उपक्रम जळगाव मनसेच्या वतीने राबविण्यात आले. यावेळी उपक्रमातून कमी किंमतीत पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली.
जळगाव शहरवासीयांसाठी ५४ रुपये लिटर या दराने पेट्रोल उपलब्ध झाले. जळगावात मनसेकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, विनोद शिंदे, किरण पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.