अश्लिल छायाचित्र ,व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

0

 

जळगाव ;- अश्लील छायाचित्र आणि व्हिडीओ काढून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी चौघांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरूणीचे अश्लिल छायाचित्र आणि व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर वारंवार अत्यााचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी वय ३०, राहूल सुनिल चौधरी वय-२८, सतिष रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण वय-२८ आणि गणेश संजय सोनवणे या चौघांनी तरूणीला तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयित आरोपी सुदाम संभाजी कोळी याने पिडीत तरूणीवर मार्च २०२३ ते १८ ऑक्टोर २०२३ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केला. तसेच राहूल चौधरी, सतिष नाईक, गणेश सोनवणे यांनी पिडीत तरूणीला गोळ्या देवून सुदाम कोळी याला मदत करत होते. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पिडीत तरूणीने पहूर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी , राहूल सुनिल चौधरी , सतिष रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण वय-२८ गणेश संजय सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.