जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार

0

जळगाव;- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना एमआयडिसीतील अजिंठा रोडवरील रेमंड चौफुली येथे ४ रोजीच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. प्रणव प्रशांत कुदळे वय २२ रा. तुळजाई नगर, कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

एमआयडीसी परिसरात कुसुंबा गावालगत असणाऱ्या तुळजाई नगर येथे प्रणव कुदळे हा आई वडील यांच्यासोबत राहायला होता. तो बॅनर लावण्याचे काम करायचा चार दिवसांपुर्वीच त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. बुधवार ३ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता प्रणव कुदळे याने त्यांच्या काकाला रेल्वेस्टेशन येथे सोडले. त्यानंतर परत घरी येण्यासाठी गुरूवार ४ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता एमआयडीसीतील रेमंड चौकाजवळून जात असतांना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला एकुलता मुलगा मयत झाल्याने आई वडील आणि बहिण यांनी एक आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणवच्या पश्चात आई प्रिया, वडील प्रशांत कुदळे आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.