न्यायासाठी दाम्पत्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोयाबिन आणि मका यांची परस्पर विक्री करून फसणूक करून पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने पत्नीसह पतीने मंगळवारी १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Jalgaon Collector Office) उपोषणाला बसले आहेत.

जामनेर (Jamner) तालुक्यातील नेरी (Neri) येथील रहिवाशी सुनिल पाटील हे पत्नी वंदना पाटील यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती व व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. जामनेर येथील ईश्वरलाल किसनलाल कोठारी, अतुल सुरेश कोठारी, सुरेश किसनलाल कोठारी यांनी सुनिल पाटील याच्या मालकीचा सोयाबिन आणि मका या मालाची परस्पर विक्री करून फसवणूक केली होती.

याप्रकरणी सुनिल पाटील व त्यांची पत्नी वंदना पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली होती. परंतू पोलीसांनी अद्यापपर्यंत तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाही. पोलीसांकडून न्याय मिळत नाही म्हणून वंदना पाटील यांनी पती सुनील पाटील यांच्यासह मंगळवारी १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा वंदना पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.