ब्रेकिंग! जळगाव जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी 

येत्या दोन दिवसानंतर पदभार स्वीकारण्यासाठी जळगावात येणार 

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी येत आहेत. ते मुंबई येथील पोलीस उपायुक्तपदाचा पदभार सोपवल्यानंतर येत्या दोन दिवसानंतर पदभार स्वीकारण्यासाठी जळगावात येणार आहेत, अशी माहिती रेड्डी यांनी लोकशाहीशी बोलतांना दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. एम. राजकुमार यांची सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबई येथील पोलीस उपायुक्तपदी असलेले एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी येत आहेत.

शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी सायंकाळी भारतीय व राज्य पोलिस सेवेतील अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यात जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांचीही बदली झाली आहे.

पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होत असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी एमबीबीएस ची पदवी घेतली असून त्यांनी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्यात काम केले आहे. तर पोलीस अधीक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातही ते कार्यरत होते. तेथून गडचिरोली जिल्ह्यात विशेष अभियान योजना अंतर्गत अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले.

नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या जागी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक व ठाणे शहर सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे. तर चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांची पुणे ग्रामीण अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य मुंबई सायबर सेलच्या कविता नेरकर बदलून येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.