यंदा “शुभमंगल” धुमधडाक्यात, तब्बल ६१ मुहूर्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

यंदा म्हणजेच सन २०२४ मध्ये तब्बल ६१ विवाह मुहूर्त असल्याने यंदाची लग्न सराईत शुभ मंगल धुमधडाक्यात होणार आहे.  गेल्या जानेवारीत ८ मुहूर्त निघून गेले असले तरी अजूनही ५३ मुहूर्त बाकी आहे.  यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुट्ट्यांचे  नियोजन करुन मे महिन्यात लग्न मुहुर्त साधणाऱ्यांची यावेळी मात्र पंचाईत झाली आहे.  यंदाच्या मे महिन्यात १ व २ तारीख वगळता मुहुर्त नसल्याने मोठी पंचाईत होणार आहे.

यंदाच्या मे महिन्यात हिंदू पंचागानूसार व विवाह ज्योतिष पंडिताच्या अभ्यासानूसार मे महिन्यात शुक्राचा अस्त सांगीतला आहे.  या काळात विवाह व अन्य शुभ कार्य वर्ज्य मानले जाते.  या काळाला बुडी सुद्धा संबोधले जाते. तरीही २०२४ फेब्रुवारीत १६, मार्च मध्ये ८, एप्रिल  ४, जुलै ९, नोव्हेंबर ८ व डिसेंबर ८ असे तब्बल ५३ मुहुर्त असल्याने यंदा शुभ मंगल धुमधडाक्यात होणार आहे.

दुसरीकडे मात्र बहुत करुन नौकरदार, शेतीवाडी व शहरात राहणार्‍या वराला मुली प्राधान्य देत असल्याने जगांच्या पोशिंदा असलेल्या तरुण सधन संपन्न  शेतकरी युवकांना सुध्दा विवाह इच्छुक युवतींनी  व त्यांच्या पालकांनी प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी विवाह इच्छुकांच्या कुंटुबियांन कडून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.