जळगाव शहरात आज पासून बहिणाबाई महोत्सवाला सुरुवात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भरारी फाउंडेशन तर्फे गुरुवारी दिनांक 25 पासून बहिणाबाई महोत्सव सुरू होत आहे. या उत्सवात विविध प्रकारच्या वस्तूंच्या स्टॉलसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ही अनुभवायला मिळणार आहे. भरारी फाउंडेशन तर्फे 25 ते 29 जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर बहिणाबाई महोत्सव होणार आहे. यंदा महत्त्वाचे 9वे वर्ष आहे.

25 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सागर पार्क मैदानावर उद्घाटन करण्यात येईल. खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, भालचंद्र पाटील, श्रीराम पाटील, अनिल कांकरिया, डॉक्टर पी आर चौधरी, बाळासाहेब सूर्यवंशी, आदी उपस्थित राहतील. यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण म्हणजे खानदेशातील पर्यटन स्थळांच्या माहितीचे दालन, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, राम मंदिर प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

असे आहेत कार्यक्रम

२५ जानेवारी : महिलांसाठी जागर सखींचा, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

२६ जानेवारी : ‘एक शाम देश के नाम’ देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

२७ जानेवारी : गीतरामायणातील गाण्यांवर ‘अवधेय’ नृत्याविष्कार व मराठी संस्कृतीचा फॅशन शो

२८ जानेवारी : ‘भाव युवा मनाचे’ भावगीतांचा कार्यक्रम, ‘आयतं पोयतं सख्यानं’ हे एकपात्री नाटक

२९ जानेवारी : शाहीर रामानंद उगले यांचा शिवराज्याभिषेक पोवाडा

Leave A Reply

Your email address will not be published.