अ.भा.मराठी नाट्यपरिषदेतर्फे जळगावात उद्यापासून ‘नाट्यकलेचा जागर’

0

जळगाव : यंदा अभा मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन साजरे होत आहे. हे संमेलन संपुर्ण महाराष्ट्रात एकुण ९ ठिकाणी साजरे होत असुन त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर ‘नाट्यजागर’ सुध्दा होत आहे. हा नाट्य जागर साठी महाराष्ट्रातील २२ केंद्रांवर होणार असुन, त्यातील एक केंद्र जळगाव आहे.
के.सी.ई.सोसायटीचे एम.जे. कॉलेज नाट्यशास्त्र विभाग, आय. एम.आर. जळगाव व कान्ह कला केंद्र यांच्या सहकार्याने जळगाव केंद्रावरील या सर्व स्पर्धा दि. २६ जानेवारी ते २ फेबवारी पर्यत चालणार आहेत. त्याचे सर्व टाईमटेबल अ भा मराठी नाट्य परिषदेच्या वेबसाईट वर जाहिर झाले आहे. दि. २६, व दि.२७ जानेवारीला बालनाट्य स्पर्धा तर दि २८ जानेवारीला एकपात्री स्पर्धा के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहेत.

दि.२६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता या बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, पहिल्या दिवशी भाग्यदीप थिएटर्स, तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय चाळीसगाव यांची २, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, के.सी.ई. सोसायटीचे ए.टी. झांबरे माध्य. विद्यालय या संघांची ५ बालनाट्ये सादर होणार आहेत. दि. २७ जानेवारी रोजी एकूण १० बालनाट्ये सादर होणार असून, यात ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, रावसाहेब रुपचंद विद्यालय, नाट्यरंग थिएटर्स, न्यू इंग्लीश स्कूल साक्री, जि. धुळे, खान्देश नाट्य प्रतिष्ठान, शेठ ला.ना. सार्व. विद्यालय, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ, अनुभूती निवासी शाळा शिरसोली, रामचंद्र चितळे माध्य. विद्यालय देवपूर धुळे या १५ संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेला जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी उपस्थिती देवून, बालकलाकारांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन के. सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, आय.एम.आर.चे डायरेक्टर प्रा.डॉ.बी.व्ही.पवार, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना. भारंबे, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे आणि उपाध्यक्ष अँड संजय राणे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.