भाऊसाहेब राऊत विद्यालयात चोरी करणाऱ्या तिघांना अटक

0

जळगावः – शहरातील बी. जे. मार्केट परिसरात असलेल्या भाऊसाहेब राऊत विद्यालयात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर तो ऐवज घेणाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शहरातील गायत्री नगरात लक्ष्मण तायडे हे भाऊसाहेब राऊत विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी तायडे हे शाळेच्या सर्व रुमांना कुलूप लावून घरी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी – सकाळी त्यांचे सहकारी शाळेत आले. शाळेतील शिक्षक सागर हीवराळे हे वर्ग उघडत असतांनारुमध्ये चोरी झाल्याची खात्री झाली. चोरट्यांनी याठिकाणाहून २ हजार ५०० रुपयांचे पाच पंखे आणि ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना संशयितांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस नाईक जुबेर तडवी व पोकॉ अमित मराठे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
हि कामगिरी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सटेबल सलीम तडवी, नरेश सोनवणे, पोलीस नाईक जुबेर तडवी, पोकॉ अमितकुमार मराठे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.