जळगाव-पाचोऱ्या रस्त्यावर भीषण अपघात, २ जण गंभीर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव-पाचोऱ्या रस्त्यावर दि. १७ रोजी रात्रीच्या जळगावहून शिरसोली येथे दुचाकीने जात असलेल्या तीन तरुणांना भरधाव वेगात असलेल्या चारचाकीने जबर धडक दिली असून, यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातून शिरसोली गावी तीन विद्यार्थी एमएच-१९ सीएन ९१२७ क्रमांकाच्या दुचाकीवरून रात्री १० वाजेच्या सुमारास जात असतांना जैन इरिगेशनच्या जवळ जवळ एमएच१९ सीयू ८०९३ क्रमांकाच्या भरधाव वेगाने जळगावकडून जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यात येथील पियुष ताडे, किशोर काटोले आणि रोहित ताडे यांचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत या तिन्ही विद्यार्थ्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील रोहित ताडे आणि किशोर काटोले या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.