मोबाईल चोर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सद्य परिस्थितीत दिवसेंदिवस चोरीचे सत्र वाढीस लागत आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली असून शहरात मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर आरोपी कडून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. युसूफ शेख ऊर्फ चिल्या इसा शेख असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

या घटनांचा सविस्तर आढावा घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरट्याचा शोध घेत त्यास अटक करण्याच्या सूचना व आदेश दिले होते. संशयित युसूफ शेख ऊर्फ चिल्या (रा. हुडको, शिवाजीनगर ) या मोबाइल चोराची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, राहुल पाटील या पथकाने संपदा रचून शिवाजीनगर भागातून  संशयित युसूफ शेख यास ताब्यात घेत अटक केली. यानंतर दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची माहिती संशयित युसूफ शेख याने पोलीसांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.