इंस्टाग्राम अँप डाउन झाल्याचा युझर्सना मनस्ताप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अँप आज इंस्टाग्राम सर्वर अचानक डाउन झाल्याने युझर्सना मनस्ताप सहन करावा लागला. इंस्टाग्रामवर पोस्ट अपडेट आणि शेअर काहीच होत नव्हते. आज सकाळी ९:४५ ते १२:४५ या वेळेदरम्यान लॉगिन करतांना युझर्सना या अडचणी जाणवून आल्या. मात्र ही अडचण सर्वांना आलेली नसून मोजक्याच जणांना येत होती हे जाणवून आले.  बऱ्याच जणांनी हे देखील ट्विट केलेल की इंस्टाग्राम रिफ्रेश करतांना ते रिफ्रेश झालं नाही. डाउन डिटेक्टरने या वृत्तास दुजोरा दिलेला आहे.  दिल्ली, लखनऊ, मुंबई, बंगळुरू, इत्यादी ठिकाणी इंस्टाग्राम लॉगिन संदर्भात समस्या आढळून आली. यापूर्वी १९ एप्रिल मंगळवार रोजी देखील सर्वर डाउन झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.