इनव्हील ईस्टचे पदग्रहण साेहळा‎

0

जळगाव |‎ इनव्हील ईस्टच्या पदाधिकाऱ्यांचा‎ गणपतीनगरातील रोटरी हॉल येथे‎ वार्षिक पदग्रहण सोहळा नुकताच‎ झाला. मावळत्या अध्यक्षा नीता‎ परमार यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा‎ बबिता मंधान यांना तर मावळत्या‎ सचिव बबिता मंधान यांनी नूतन‎ सचिव कार्तिकी शाह यांना पदभार‎ सुपूर्द केला.‎ कार्यक्रमात माजी अध्यक्षा नीता‎ परमार यांनी वर्षभराचा अाढावा‎ सांगितला. क्लबला मिळालेल्या‎ अवॉर्डचे वितरण करण्यात आले.‎ क्लबने डॉ. पुनम मोतीरानी यांच्या‎ सहकार्याने थॉयराइड कॅम्पच्या‎ प्रोजेक्टची घोषणा केली. नूतन‎ कार्यकारिणीत उपाध्यक्षा गीता शाह,‎ आयपीपी नीता परमार, कोषाध्यक्षा‎ दिशा अग्रवाल, आयएसओ भावना‎ चौहान, प्रियंका गांधी, काजल‎ फिरके, नेहल कोठारी, कविता‎ कराचीवाला, कीर्ती काबरा, शोभना‎ मखवाना, ईशा गोयंका, मीनल‎ लाठी, माधवी आसावा आदींचा‎ समावेश असल्याचे प्रियंका गांधी‎ यांनी सांगितले. यावेळी डिस्ट्रिक्ट‎ चेअरमन गिरीश ठाकरे, प्रिती दोशी,‎ डॉ. अर्चना काबरा उपस्थित होते.‎

Leave A Reply

Your email address will not be published.