ईच्छादेवी चौक ते डी मार्ट रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने आंदोलन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ईच्छा देवी चौक ते डी मार्ट या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झालेली असुन या रस्त्यावर अर्धा फूट ते एक फूटापर्यंत खड्डे पडलेले आहेत . पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून जणू काही तलावच तयार झालेला आहे . यामुळे नागरिकांचे लहान – मोठे अपघात होत आहेत व अतोनात त्रास होत आहे . त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा किंवा रस्त्याची किमान दुरुस्ती तरी व्हावी यासाठी व यासर्व प्रकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने साचलेल्या पाण्यात कागदी नाव सोडुन , प्रतिकात्मक मासेमारी करत व खड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले . सदर आंदोलनादरम्यान रस्तावरची वाहतूक बंद करण्यात आलेली होती .

आंदोलन सुरू असतांना  याविषयी जाब विचारण्यासाठी जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष राऊत यांच्याशी फोन वर चर्चा केली असता दोघांनीही रस्ता त्यांच्या अधिपत्याखाली येत नाही असे सांगितले , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही . वाहतूक बंद असल्याने याठिकाणी मोठया प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालेली होती .  आंदोलनस्थळी एम आय डी सि पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरासे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करत लवकरच रस्त्याची समस्या मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले . सुमारे एक वर्षापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्ती साठी महानगरपालिकेच्या वतीने 25 लाखांची निविदा काढण्यात आलेली होती व बिल देखील अदा करण्यात आले . रस्त्याचे थातुरमातुर काम करून बिल पूर्ण काढण्यात आले , यासंदर्भात या प्रभागाच्या नगरसेविका खाटिक यांनी देखील काम न होता बिल काढण्यात आले अशी तक्रार दिलेली होती पण मक्तेदाराच्या प्रेमापोटी व आर्थिक हितसंबंध जोपासत सबंधितांनी या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले . याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे . तसेच याठिकाणी अपघात होऊन नागरिकांना जिवीत हानी झाल्यास याची जबाबदारी कोण घेईल ?  रस्ता महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नव्हता मग रस्ता दुभाजक व दुरुस्ती महानगरपालिकेच्या वतीने कशी करण्यात आली ? असे सवाल देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आले . सदर काम लवकरात लवकर न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देखिल जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिलेला आहे .

सदर आंदोलनात जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , सरचिटणीस सुनील माळी , युवक अध्यक्ष रिकू चौधरी , दिलीप माहेश्वरी , राजू मोरे , रमेश बहारे , सुहास चौधरी , सुशिल शिंदे , रहीम तडवी , इब्राहिम तडवी सर , अर्षद उर्फ सोनू शेख , वासीम शेख , आरिफ शहा बापू , इरफान बागवान , अकिल बाबा शेख , सत्तार भाई वेल्डिंगवाले , अजीज शेख , इब्राहीम भाई खान , युनूस शहा , कुणाल बागुल , भला तडवी , हितेश जावळे , राजू बाविस्कर , संजय जाधव आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.