जळगाव रेल्वेस्थानकावर तरुणाला मारहाण, तीन तोळ्यांची सोनसाखळी लांबवली

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नेहमीच वर्दळीने भरलेल्या रेल्वेस्थानकावर गुन्हे घडतच असतात. तसाच काह प्रकार जळगाव रेल्वेस्थानकावर घडला आहे. जळगाव रेल्वेस्थानकावर मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाला मारहाण करत त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी चोरून आरोपी पसार झाले. या प्रकरणी शहर पोलिसांत
गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील भूषण हिरालाल चौधरी यांचा व्यवसाय आहे. नशिराबाद येथे ते आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. दरम्यान भूषण हा २५ ऑक्टोम्बरला मध्यरात्री एकच्या सुमारास कामानिमित्त जळगाव रेल्वेस्थानकात आले होते. रिक्षा थांब्याजवळ उभा असताना चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे या दोघांनी भूषणची कुरापत काढली. कारण नसताना शिवीगाळ करून हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

वाद घालू नका, असे म्हणत भूषणने प्रतीकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला दोघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत भूषणच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची ९७ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून दोघे पसार झाले. सोनसाखळी टॉसल्याचे लक्षात येताच भूषणने आरडा-ओरडा केली. मात्र त्याच्या मदतीला कुणी आले नाही. यानंतर शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांना माहिती दिल्यावर मारहाण करणारे चेतन आणि अविनाश यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून संधायितांचा शोध सुरु आहे. मात्र दोघे सापडले नाही. सहाय्यक उपनिरीक्षक बशीर तडवी तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.