महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्यमीतर्फे तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

येथील उद्यमी महिला पतसंस्थेतर्फे व.वा. वाचनालयाच्या नूतन सभागृहात २७,२८ व२९ ऑक्टोबर असे तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश खुला आहे. प्रदर्शनाचे हे २१ वे वर्ष आहे.

१९९४ मध्ये महिलांनी सुरू केलेली उद्यमी पतसंस्था ही कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता केवळ महिला लघुउद्योजक, व्यावसायिक यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रदर्शनाचे आयोजन करीत असल्याचे चेअरमन पद्मजा सुशील अत्रे यांनी सांगितले.

शुक्रवार २७ रोजी सकाळी १० वाजता डॉ.शैलजा चव्हाण व माजी नगरसेविका अलका लढ्ढा यांच्या हस्ते  प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात दिवाळीसाठी लागणारे साहित्य, आकर्षक सजावटीच्या वस्तू, आकाश कंदील, पणत्या, रांगोळ्या, ड्रेस मटेरियल, साड्या, इमिटेशन ज्वेलरी, खाद्यपदार्थ महिला व्यावसायिक उपलब्ध करून देणार आहेत. ऑनलाइन शॉपिंग ऐवजी आपल्या स्थानिक महिला लघुउद्योजक, व्यावसायिक यांना पाठबळ देण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन उद्यमीच्या सर्व संचालक मंडळांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.