जळगाव जिल्हा कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करून गंभीर गुन्ह्यातील बंदीने फोडल्या काचा

0

जळगाव ;- आपली जळगाव कारागृहातून नाशिक जेल येथे रवानगी होणार असल्याच्या रागातून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील एका कैद्याने कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करून खिडकीच्या काचा फोडल्याचा धक्कदायक प्रकार घडला असून यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी लखन उर्फ गोलू दिलीप मराठे हा न्यायालयाच्या आदेशानुसार ३ ऑगस्टपासून जळगाव कारागृहात आहे. त्यानंतर न्यायदंडाधिकारी जळगाव यांनी १३ ऑक्टोबर रोजीच्या आदेशानुसार त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार जळगाव मुख्यालयातील पथक आज १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव कारागृहात लखन उर्फ गोलू याला घेण्यासाठी दाखल झाले असता आपली नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे बंदी लखन उर्फ गोलू याचा समजले. त्यानंतर नातेवाईकांच्या मुलाखतीनंतर सर्कल २ मधून बॅरेक क्रमांक ७ मध्ये मुलाखत कक्षाजवळ असलेल्या कारागृह अधिक्षक कार्यालयाच्या मागील बाजूस खिडकीची लोखंडी जाळी हाताने काढून काच तोडून तरूंग अधिक्षक ए.आर. वांडेकर यांना आर्वच्च भाषेत बोलून माझी जेलची बदली पोलीसांनीच केली असे म्हणून शिवीगाळ केली. याप्रकरणी वरीष्ठ तुरूंग अधिकारी गजानन विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.