राष्ट्रीय डाक सप्ताह च्या निमित्ताने मेल्स आणि पार्सल दिवस रेल्वे डाक सेवा जळगाव कार्यालयातउत्साहात संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सविस्तर वृत्त असे की, देशभरात टपाल सप्ताह हा साजरा केला जात असताना, आज दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी मेल्स आणि पार्सल दिवसाचे आयोजन रेल्वे मेल सर्व्हिस एल डीव्हीजण, भुसावळ अंतर्गत जळगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नम्बर-३ स्थित आर.एम.एस ऑफिस जळगाव येथे करण्यात आले. प्रसंगी कार्यालयाचे सब रेकॉर्ड ऑफिसर एस.डी कोल्हेकर तसेच ओ.ए. दिपक डी पाटील यांनी आपल्या मनोगतात पोस्ट खात्याच्या माध्यमातून जनतेला तात्काळ सेवा देण्यासाठी मेल्स सेक्शन चे काय महत्व आहे याचे सविस्तर विवेचन केले.

भविष्यात पोस्ट खात्याच्या माध्यमातून गल्ली ते दिल्ली पर्यंत विविध प्रकारचे मेल्स तसेच पार्सल सेवा तात्काळ सर्वसामान्य व्यक्ती पर्यंत पोहचवण्यास कटीबद्ध राहण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांन सोबत निर्धार केला. ह्या कार्यक्रम साठी श्री बी व्ही भावसार, श्रीमती पी बी पाटील, रोशनी जे कोळी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.