पहुरमध्ये २ गटात तुफान हाणामारी, ४८ जणांवर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील लेलेनगर परिसरात दि. ११ बुधवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास दोन गटांत जबर हाणामारी झाली. यात काही जण जखमी झाले असून, लहान मुलांवरून वाद झाल्याचे समोर येत आहे. या घटनेनंतर पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठत परिस्थिती आटोक्यात आणली. घटनेप्रकरणी ८४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अजून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे समोर येत आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांपैकी निर्दोष लोकांची नावे वगळण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांच्याकडे केली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे म्हणाले, की जे नव्हते त्यांच्यावर अन्याय होणार नाही. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे. या वेळी पोलिस उपअधीक्षक धनंजय येरूळे, पोलिस निरीक्षक सचिन सानप, माजी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बनकर, माळी समाज माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर करवंदे, अशोक जाधव, पत्रकार गणेश पांढरे, सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य तेजराज बावस्कर, शेख युसूफ शेख गयासोद्दीन, शेख अमीन, शरद पांढरे, ईका पहिलवान, मुन्ना पठाण, रवींद्र मोरे, इस्माईल, शेख सलीम, सचिन कुमावत आदी उपस्थित होते.

दंगा नियंत्रण पथक तैनात
घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. परिस्थितीवर पोलिस निरीक्षक सचिन सानप व वरिष्ठ अधिकारी यांचे लाख आहे. दरम्यान, सदर घटनेच्या वृत्तांकनासाठी ग्रामीण रुग्णालयात गेलेल्या पत्रकारांना अश्लील शिवीगाळ करत वार्तांकनात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी शहर पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आली. या संदर्भात पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, या घटनेचा शहर पत्रकार संघटनेतर्फे निषेध करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.