खाद्यसंस्कृती : बदाम चिक्की

0

लोकशाही विशेष लेख 

थंडी जसजशी वाढु लागली की काही पदार्थ आवर्जून केले जातात, जसे की डिंक लाडू, पौष्टिक लाडू, वगैरे..  मी सुद्धा असे काही पदार्थ बनवतेच, पण आजून फार अशी थंडी पडली नाही म्हणून घरी  आणलेल्या सुका मेवाचे काही तरी करुयात असा विचार केला आणि लगेच रेसिपी करायला घेतली.

बदाम चिक्की

साहित्य :

१ वाटी बदाम

१ वाटी साखर

१ चमचा तूप

 

कृती :

१) प्रथम बदामाचे दोन तुकडे करून घ्यावे.

२) नंतर ते मंद आचेवर भाजून घ्यावे.

३) एका कढईत साखर घालून ती वीरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे.

४) आता त्यामध्ये तूप घालून मिश्रण एकजीव करावे.

५) एकतारी पाक करून घ्यावा.

६) आता त्यामध्ये बदाम काप घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे.

७) लगेचच एका तूप लावून घेतलेल्या पाटावर हे मिश्रण ओतून हवा तसा  शेप द्यावा.

८) चिक्की थोडी थंड झाल्यावर त्याचे काप करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.